बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने तिला समन्स बजावले आहे.

ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणी ईडीने सप्टेंबर महिन्यात रकुलला चौकशीसाठी बोलावले होते.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने टॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चौकशी केली आहे.

विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी रकुलची सुमारे अडीच तास चौकशी केली होती.

हे प्रकरण 40 वर्षे जुने ड्रग्सशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी इतर अनेक कलाकारांनाही समन्स बजावण्यात आले होते.

तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017 मध्ये 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होती आणि 12 गुन्हे दाखल केले होते.

या प्रकरणी अधिकाऱ्यांनी 11 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.