घराच्या दारावर कधीही घड्याळ लावू नका.

घरात घड्याळ नेहमी पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेकडे ठेवा.

या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम करतात.

घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नका, त्यामुळे सौभाग्य, धन आणि वैभव येणे थांबते.

वास्तूनुसार पेंडुलम असलेले घड्याळ अधिक शुभ मानले जाते.

हे घड्याळ घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्याने यशाचे मार्ग खुले होतात.

घड्याळ चुकीचे चालत असल्यास योग्य वेळेशी जुळवा.

पांढरे, तपकिरी आणि लाल रंगाचे घड्याळ घरात लावा.

गोल व चौकोनी आकाराचे घड्याळे लावणे शुभ मानले जाते.

निळ्या, काळ्या आणि भगव्या रंगाचे घड्याळ कधीही घरात लावू नये.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.