हिंदू पंचागानुसार देव दीपावली कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. अशी मान्यता आहे, यानिमित्ताने देवी-देवता दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर येतात. यंदा कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबरला आहे. या दिवशी चंद्रग्रहणही आहे. हे वर्षातील शेवटचे ग्रहण आहे. भारतात चंद्रग्रहण संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल आणि 6.19 वाजता संपेल. जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होते. अशी धार्मिक मान्यता आहे की, या काळात पृथ्वीवर राहू आणि केतूची वाईट दृष्टी राहते. सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान श्री हरी विष्णूजींनी अमृत मिळविण्यासाठी राहू-केतू यांचा वध केला होता. त्यावेळी राहू आणि केतू चंद्र आणि पृथ्वीच्या सावलीत स्थान देण्यात आले होते भारतात चंद्रग्रहण प्रभावी ठरेल. या दिवशी सुतकही वैध असेल. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. त्यामुळे केलेले कामही बिघडते.