चाणक्य नीती म्हणते की, वाईट काळात माणूस देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होते तेव्हा तो देव तसेच धर्माकडे दुर्लक्ष करतो
धिक पैशाच्या हव्यासापोटी तो अधर्माच्या मार्गावर जातो. ही चूक करू नका, कारण असे करणाऱ्यांवर लक्ष्मी आपला आशीर्वाद देत नाही आणि सर्व सुख-शांती हिरावून घेते.
चाणक्य सांगतात की पैशाचा अभिमान चांगल्या नात्यातही दुरावा आणतो, म्हणून कुटुंबात चुकूनही पैशाचा अभिमान दाखवू नका. संपत्ती आज आहे उद्या नाही पण तुमचे प्रियजन तुम्हाला मरेपर्यंत साथ देतील.
पैसा कमावण्यासाठी तुमचा स्वाभिमान कधीही पणाला लावू नका. असे लोक ना घरात राहतात ना घाटात. पैशाच्या लालसेपोटी स्वाभिमानाशी तडजोड करू नका.
चाणक्यनीती म्हणते की जेव्हा एखादी व्यक्ती समृद्ध असते तेव्हा अनावश्यक पैसा खर्च करण्याऐवजी त्याने आपल्या कमाईचा काही भाग धार्मिक कार्यात गुंतवला पाहिजे.
चाणक्यनीतीनुसार, तुमच्या पैशाचा वापर कधीही इतरांचे नुकसान करण्यासाठी करू नका. असे केल्याने श्रीमंतही गरीब होतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसा मिळतो तेव्हा तो त्याचे वाईट दिवस विसरतो आणि काही चुका करतो
ज्यामुळे तो पुन्हा गरिबीच्या उंबरठ्यावर येतो. या चुका करू नका.
आचार्य चाणक्य लोकांना त्या गोष्टी सांगतात, ज्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहेत. यामुळेच शेकडो वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्यनीतिची लोकप्रियता आणि महत्त्व जराही कमी झालेले नाही
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)