आचार्य चाणक्य म्हणतात, कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी कुटुंबप्रमुखाची (Family Head) भूमिका खूप महत्त्वाची असते.



कुटुंबातील प्रमुखाचे स्थान सर्वात महत्वाचे आहे, कारण त्याचा एक निर्णय संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडवू शकतो किंवा क्षणात खराबही करू शकतो.



चाणक्यांनी सांगितले की, जर घराच्या प्रमुखाला या 3 सवयी असतील तर त्याच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही.



घरच्या प्रमुखाची म्हणजेच कुटुंबप्रमुखाची जबाबदारी खूप वाढली आहे. प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवतो.



अशा स्थितीत त्याने कोणत्याही लहान-मोठ्या विषयातील प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच त्याविषयी मत बनवावे.



कारण जे लोक इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात, त्यांचे कुटुंब विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही



कुटुंबप्रमुख जर पैसे पद्धतशीरपणे खर्च करत असेल, अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवत असेल. तर संकटातही त्याचे कुटुंब एकत्र राहते.



आचार्य चाणक्य म्हणतात की, कुटुंबाचा प्रमुख हा रांगेत उभा असलेल्या पहिल्या व्यक्तीसारखा असतो. एक जण उभा राहतो, रांगेतले बाकीचे लोकही त्याच पद्धतीने उभे राहतात.



नेहमी चांगली कामे करण्याची घरप्रमुखाची भावना आणि विचार करून घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहण्याची सवय कुटुंबाचे भविष्य सुधारते.



कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्त ठेवण्यासाठी घराच्या प्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहणे आवश्यक आहे.