विश्वास ही मानवी जीवनातील एक अशी गोष्ट आहे, जी एखाद्या व्यक्तीचे करिअर आणि नातेसंबंध घडवू शकते किंवा तोडू शकते. चाणक्यनीतीनुसार, कोणत्या लोकांवर विश्वास ठेवू नये? जाणून घ्या.. शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. असे लोक रागाच्या भरात कोणाचेही नुकसान करू शकतात. अशा लोकांपासून दूर राहणे चांगले. सत्तेवर असलेल्या आणि शक्तीशाली व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. अशा लोकांशी मैत्री किंवा शत्रुत्व चांगले नाही. कारण ते स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला अडकवू शकतात. अशा परिस्थितीत तुमचे करिअर आणि नातेसंबंध दोन्ही बिघडतात. वाईट प्रवृत्ती असलेल्या स्त्रीवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःला संकटाच्या जाळ्यात अडकवण्यासारखे आहे. चाणक्यनीती म्हणते की, ज्या महिला स्वतःच्या फायद्यासाठी आपले कुटुंब आणि पती देखील सोडत नाहीत त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. हिंसक किंवा विषारी प्राण्याला कधीही छेडू नका. तसेच त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतात (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)