ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या ग्रहांचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. 26 ऑक्टोबरला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल यापैकी 3 राशी अशा आहेत की बुधाच्या या बदलामुळे खूप धनलाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिकदृष्ट्या खूप मजबूत वाटेल. तसेच बुद्धिमत्तेने सर्व प्रकरणे सहज सुटतील. कन्या- बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. धनु- बुधाच्या या बदलामुळे धनु राशीच्या लोकांना धनप्राप्ती होणार आहे. उत्पन्न वाढेल. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. कुंभ - या राशींच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ फल देणार आहे. या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही भरपूर फायदा होणार आहे. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. पदोन्नतीची शक्यता आहे. शेअर मार्केट, लॉटरीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. वाहन सुख वाढेल. वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो.