केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प 2025-26 (Union Budget 2025) सादर केला.

Image Source: PTI

यावेळी भारताला अणुऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी मोठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.

Image Source: PTI

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अणु क्षेत्रासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Image Source: PTI

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अणुऊर्जा अभियानांतर्गत, विकसित भारतासाठी 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा विकसित केली जाईल. यासाठी अणुऊर्जा कायद्यात सुधारणा केली जाईल.

Image Source: PTI

याशिवाय सरकार जहाजबांधणीवर भर देत असल्याने जहाजबांधणी आर्थिक सहाय्य योजना पुन्हा सुरू केली जाईल.

Image Source: PTI

जहाज बांधणी गटांना सुविधा पुरवल्या जातील, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

Image Source: PTI

नोकरदारांना मोठा दिलासा-

मोदी सरकारनं बजेटमध्ये नोकरदारांना मोठा दिलासा दिलाय. आता 1 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे.

Image Source: PTI

याचा अर्थ महिन्याला एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कोणताच कर नसेल. आतापर्यंत सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. नव्या कररचनेतही मोठे बदल करण्यात आलेत.

Image Source: PTI

पुढच्या आठवड्यात नवं आयकर विधेयक सादर करण्यात येणार आहे.

Image Source: PTI

त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल माहिती देण्यात येईल. टॅक्स स्लॅबमधल्या बदलामुळे सरकारचा एक लाख कोटींचा महसूल घटणार आहे.

Image Source: PTI