दीपिका पदुकोणने 8 सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं रणवीर आणि दीपिकाने सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लेकीचं स्वागत केलं. त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं बारसंही नुकतच केलंय. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लेकीचं नाव 'दुआ 'असं ठेवलंय. रणवीर आणि दीपिकाने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'दुआ पदुकोण सिंग.. दुआ म्हणजे प्रार्थना. दीपिका आणि रणवीरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करुन त्यांना ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावरील युजर्सचा दावा आहे की दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नाव मुस्लिम ठेवले आहे. त्यामुळे धर्मावरुन प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, दुआ नाही प्रार्थना.. टीप वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.