आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा शाही विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडला.

या डेस्टिनेशन वेडिंगकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

आमिर खानची लेक हिंदू की मुस्लिम पद्धतीने लग्नबंधनात अडकणार याची सर्वांना उत्सुकता होती.

पण, आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे.

आयरा आणि नुपूर यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला.

त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयराने नुपूरसोबत ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे.

लग्नाआधी मेहंदी आणि संगीत सोहळ्याची झलक समोर आली होती.

आयरा आणि नुपूर लग्नसोहळ्या दरम्यान खूपच आनंदी दिसत होते.

यावेळी नववधू आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.