हे पनौती तिकडे गेले आणि भारतीय संघाला हरवलं. अशी जळजळीत टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केली.

यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पनौती म्हणून राहुल गांधींनी उल्लेख केला होता.

त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

राहुल गांधी यांना 25 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांत या नोटीशीला उत्तर द्यावं लागणार आहे.

राजस्थानमधील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं.

तसेच भाजपकडूनही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यात येत होतं.

आता निवडणूक आयोगाकडूनही कारवाईची भूमिका घेण्यात आलीये.

यावर राहुल गांधी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.