उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय . या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. या यादीत 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम हिचं देखील नाव आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. अर्चना गौतम मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघामधून नशीब आजमावणार आहे. अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसली होती. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे. अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे.