हिंदू पंचागानुसार, चतुर्थी तिथी प्रत्येक महिन्यात दोनदा येते. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते


शुक्ल पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणून ओळखली जाते.


नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच 27 नोव्हेंबरला चतुर्थी येत आहे.


पंचांगानुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते.


या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याबरोबरच उपवास ठेवला जातो.


या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, असा विश्वास आहे.


मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होते - 26 नोव्हेंबर, शनिवार संध्याकाळी 07.28 वाजता


चतुर्थी समाप्ती - 27 नोव्हेंबर, रविवारी दुपारी 04.25 वाजता होईल.


या दिवशी गणेशजींचे मंत्र, जप, चालीसा, अनुष्ठान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.