मूलांक 6 असलेल्या लोकांबद्दल काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. ही मुलं आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणाचंही लक्ष वेधून घेण्यात माहीर असतात. शुक्राच्या प्रभावामुळे ही मुलं जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात. हे लोक एखाद्याच्या सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात. या लोकांना महागड्या वस्तू खरेदीचा शौक असतो. त्यांना सुखी लॅव्हिश जीवन जगायला आवडतं.