अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने अत्यंत साधे असतात.
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात.
अनेक लोक यांचा गैरवापर करुन घेतात, स्वत:च्या फायद्यासाठी लोक यांचा वापर करतात.
समोरचा व्यक्ती एखाद्या संकटात असेल तर यांना लगेच भरुन येतं आणि मदतीसाठी ते पुढे सरसावतात.
छोट्या-छोट्या गोष्टींवरुन यांना लगेच रडायला येतं
नेहमी कोणावर तरी अवलंबून राहतात.
या लोकांना त्यांच्या कामात नेहमीच प्रोत्साहानाची, सहकार्याची गरज असते.
या लोकांना एखाद्या कामात यश न मिळाल्यास ते लगेच निराश होतात.
अपेक्षित असलेली गोष्ट झाली नाही तर ते लगेच खचून जातात.