अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मूलांक क्रमांकावरून ओळखले जाऊ शकते.
जाणून घेऊया मूलांक 4 असलेले लोक कसे असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते.
मूलांक 4 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप खास असते. हे लोक प्रत्येक कामांमध्ये नंबर 1 असतात.
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.
मूलांक 4 असलेल्या त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे.
या मूलांकाचे लोक प्रत्येक काम चांगले करतात. हे लोक प्रत्येक कामात निष्णात असतात.
स्वभावाने हे लोक खूप धाडसी आणि व्यवहारी असतात.
हे लोक आपल्या कौटुंबिक आणि घरातील संबंधांना खूप महत्त्व देतात.ते त्यांच्या कुटुंबियांशी सखोल संबंध ठेवतात.
या मूलांकाचे लोक अतिशय मिलनसार स्वभावाचे असतात. लोकांमध्ये सहज मिसळतात. हे लोक मनापासून मैत्री जपतात.
स्वभावाने हे लोक थोडेसे स्वार्थी आणि अहंकारी असतात त्यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)