देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)



पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. (Photo Credit : unsplash)



आज 24 मार्च होलिका दहन आहे. (Photo Credit : unsplash)



होलिका दहन दरवर्षी फाल्गुनच्या पौर्णिमेच्या तिथीला केले जाते. (Photo Credit : unsplash)



या दिवशी होळीची पूजा करून 'होलिका दहन' केले जाते. (Photo Credit : unsplash)



यंदा होळी दहनाचा शुभ मुहूर्त 24 मार्च रात्री 11 वाजून 13 मिनिटं ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. (Photo Credit : unsplash)



होलिका दहनला काही ठिकाणी संवत जाळणे, शिमगा देखील म्हटले जाते. (Photo Credit : unsplash)



हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)



यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. (Photo Credit : unsplash)



धार्मिक कथांनुसार, होलिका दहनाची कथा विष्णू भक्त प्रल्हाद, त्याचा राक्षस पिता हिरण्यकश्यपु आणि त्याची बहिण होलिका यांच्याशी संबंधित आहे. (Photo Credit : unsplash)



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)