टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने टीव्ही जगतातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंकिता लोखंडे आणि विकी यांची जोडी एकदम परफेक्ट मॅच आहे. अलीकडेच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नाचा 6 महिन्यांचा वाढदिवस साजरा केला त्याचवेळी चाहत्यांनी या फोटो व्हिडिओंमध्ये अंकिताचा बेबी बंप स्पॉट केला आहे, त्यानंतर सोशल मीडियावर अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु आहे. अंकिता खरोखरच प्रेग्नंट आहे की नाही हे फक्त अंकिता आणि विकीलाच माहीत आहे. अंकिता लोखंडे सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. वास्तविक, अभिनेत्रीने अलीकडेच पती विकीसोबत लग्नाचा 6 महिन्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.