घरच्या घरी कांदा लागवड कशी करायची? जाणून घ्या सोपी पद्धत

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

कांद्याचा वापर जवळपास सगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो.

Image Source: pixabay

घरच्या घरी कांद्याचं रोप लावण्यासाठी साधारण 6 ते 8 इंच खोल कुंडी घ्यावा. कुंडीच्या तळाशी पाणी निथळण्यासाठी किमान एक छिद्र असणे आवश्यक आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा.

Image Source: pixabay

मातीमध्ये पाणी आणि खत टाकून ते तयार करून तसेच सोडून द्या. खतासाठी गायीचे शेण किंवा इको-फ्रेंडली खताचा वापर करू शकता.

Image Source: pixabay

कांदा लागवडीसाठी असा कांदा निवडा, ज्यातून आधीच हिरवी पाने बाहेर आलेली असतील.

Image Source: pixabay

कांद्याच्या रोपाला कुंडीत थेट मातीत पेरा आणि लगेच वरून पाणी किंवा खत घालू नका, असे केल्यास लावलेला कांदा सडण्याची शक्यता असते.

Image Source: pixabay

कांद्याची लागवड मातीत अशा प्रकारे करा की कांदा पूर्णपणे मातीखाली राहील आणि हिरवी पाने असलेला भाग बाहेर दिसेल.

Image Source: pixabay

अगदी याच पद्धतीने, थोड्या थोड्या अंतरावर, गमल्यात दुसरे कांद्याचे रोप लावा.

Image Source: pixabay

कांद्याच्या रोपट्यासाठी अशी जागा निवडा जिथे सूर्यप्रकाश आणि सावली दोन्ही समप्रमाणात येतील, म्हणजे ना जास्त कडक ऊन आणि ना जास्त सावली.

Image Source: pixabay

कांद्याचे रोप फारसे सांभाळण्याची गरज नसते आणि काही दिवसातच ते हिरवेगार दिसू लागतात.

Image Source: pixabay