पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे.
अलीकडच्या काळात तिने तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले आहे.
शहनाज गिलने नुकतेच इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि सिझलिंग दिसत आहे. जंपसूटमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लाँट करत आहे.
शहनाज गिलने फिकट तपकिरी रंगाच्या पोशाखातही सुंदर दिसत आहे.
यासोबत तिने गळ्यात सोनेरी रंगाचा चोकर परिधान केला आहे. तिने तिचे केस वेगळ्या स्टाईलने बांधले आहेत.
शहनाज गिल, सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानने तिला आगामी चित्रपटासाठी साईन केले आहे. दबंग खान शहनाजची नेहमी काळजी घेतो.
‘बिग बॉस 13’ दरम्यान शहनाजचे नाव सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले होते. मात्र, अभिनेत्याच्या जाण्यानंतर शहनाज कोलमडून गेली होती.
अनेक महिने लोकांपासून दूर राहिल्यानंतर ती पुन्हा व्यावसायिक जीवनात परतली आहे.
तिच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खूश आहेत आणि तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.