परतीच्या पावसाने आधीच शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं.



शेतकऱ्यांनी जे सोयाबीन जमा करुन ठेवलं त्यालाही आग लावल्याचं काम केलं जात आहे.



परभणीच्या जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथील विठ्ठल श्रीरामे यांच्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली.



या आगीत विठ्ठल श्रीरामे यांचं मोठं नुकसान झालं आहे.



विठ्ठल श्रीरामे यांनी टाकळखोपा येथील शेतात सोयाबीन काढून त्याची गंजी लावून झाकून ठेवली होती.



मात्र काल रात्री तीन वाजता अज्ञातांनी या गंजीला आग लावली आणि पोबारा केला



वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेले पीक श्रीरामे यांच्या डोळ्यासमोर खाक झाले.



यात श्रीरामे यांचे तीन ते साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.



या प्रकरणी जिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.