सप्तशृंगीगड दसरा सोहळ्यासाठी सज्ज झाला असून दसऱ्याच्या आदल्या दिवशीच्या कीर्तीध्वजाच्या कार्यक्रमासाठी वणी गड सज्ज झाला होता.
दोन वर्षांनंतर हा उत्सव साजरा होत असून यासाठी मानकरी असलेले दरेंगावचे गवळी कुटुंबीयांनी काल वणी गडावरील 4 हजारहून अधिक उंच सुळक्यावर किर्तीध्वज फडकविला.
सप्तशृंग गडावर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून यंदा दर्शनासाठी भाविक भक्तांची रीघ लागली आहे.
त्यातच आज साजरा होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी झाली असून काल मध्यरात्री कीर्तीध्वज उत्सव पार पडला.
नऊ दिवस चालणार्या नवरात्र उत्सवाची सांगता नवमीच्या हवनाची पुर्णाहुती दुसर्या दिवशी दसर्याला देऊन होते
सप्तशृंगगडावरील शिखरावर ध्वज विजयादशमी या दिवशी सप्तशृंगीच्या शिखरावर दरेगावचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने ध्वज लावतात.
विशेष म्हणजे देवीच्या शिखरावर चढण्यासाठी कोणताही मार्ग नाही.
तरी देखील हे अवघड कार्य दरेगांवचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने करीत आहेत.
सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी दरेंगाव असून येथील गवळी कुटुंबाला किर्तीध्वज फडकविण्याचा मान आहे.
गवळी परिवारातील आजोबा रायाजी पाटील यांच्यापासून गडावर ध्वज लावण्यात येत आल्याचे गवळी कुटुंबीय सांगतात.