सभोवताली भिरभिरणारी फुलपाखरे पाहून आपले प्रत्येकाचे मन आनंदी होते.



विविध फुलांवरील मकरंद गोळा करणाऱ्या फुलपाखरांच्या धुळे जिल्ह्यात 75 तर शहरात 36 प्रजाती आढळून आले आहेत



निसर्ग वेध समितीने केलेल्या या सर्वेक्षणात ही माहिती समोर आल्याने निसर्गप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे



रंगीबिरंगी आणि विविध आकारांची फुलपाखरे ही नेहमीच कुतूहलाचा विषय असतात.



याच फुलपाखरांचे धुळ्यातील निसर्ग वेध समितीने जिल्ह्यात प्रथमच सर्वेक्षण केले.



जिल्ह्यात फुलपाखरांच्या 75 तर शहरात जवळपास 46 प्रजाती आढळून आल्या आहेत.



निसर्गाच्या अन्नसाखळीत फुलपाखरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.



अंडी, त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या, अळ्यांनी विणलेले कोष आणि त्यातून बाहेर येणारे फुलपाखरु असे त्यांचे जीवनचक्र असते.



या फुलपाखरांच्या देशात 1 हजार 504 तर महाराष्ट्रात 167 प्रजातींची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.



त्यात धुळे जिल्ह्यात 75 प्रजाती आढळून आल्याने निसर्गप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे.