वसई : गुजराती भाषेतल्या पाट्या मनसेने काढल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2018 06:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वसईत गुजराती पाट्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या ढाब्यांच्या गुजराती भाषेत असलेल्या पाट्या मनसेने काढायला लावल्या आहेत. या मार्गावरील काठीयावाडी धाबा मालकाने गुजराती भाषेत भला मोठा बोर्ड लावला होता. याआधीही मनसेनं गुजराती पाट्या काढायला लावल्या होत्या. मात्र या ढाबा मालकांनी पुन्हा गुजराती पाट्या लावल्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आज वसईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.