Bagdadi in Uran | उरणच्या खोपटा पुलाखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या आरोपीला बेड्या | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2019 12:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उरणच्या खोपटा पुलावर लिहिलेल्या वादग्रस्त मजकूर प्रकरणाचा 72 तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. वादग्रस्त मजकूर लिहून दहशत पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमीर उल्लाहशेख या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थ नगरचा राहणारा आहे. तो गेली 10 वर्षे खोपटा येथे भाडेतत्वावर राहतो आणि एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो.