Thackeray in Ayodhya | उद्धव ठाकरे यांची अयोध्या दौऱ्यावरील पत्रकार परिषद | अयोध्या | ABP Majha

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीआधी ''पहले मंदिर, फिर सरकार'' असा जाब विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी निवडणुकीनंतर मात्र राममंदिर फक्त मोदीच उभारु शकतात. अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आणि मोदी सरकारनं आता राममंदिरासाठी अध्यादेश काढावा असं आवाहनही केलं. आज शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. पत्रकार परिषदेत ''पहले मंदिर, फिर सरकार'' या नाऱ्याचं काय झालं. असा प्रश्न त्यांना यावेळी केला गेला. त्यावर उद्धव ठाकरेंनी आता ''पहले मंदिर, फिर संसद'' असं उत्तर दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram