ठाणे : राज्यभरातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर
Continues below advertisement
राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी आजपासून 2 दिवस राज्यव्यापी संपावर गेले आहेत. राज्य सरकार अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर असणाऱे सुमारे साडे तीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये अनुकंपा सेवाभर्ती विनाअट करावी, सातवा वेतन आयोग फरकासह तात्काळ मंजूर करावा, रिक्त पदं तात्काळ भरावीत, अशा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
Continues below advertisement