ठाणे : दुरुस्तीच्या कामासाठी ठाण्याचा पाणीपुरवठा उद्या बुधवारी बंद राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2018 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा उद्या एक दिवसासाठी बंद राहणार आहे. उद्या सकाळी ९ वाजल्यापासून ५ एप्रिलला सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय. शहरातील घोडबंदर रोड, पवारनगर, डोंगरीपाडा या परिसरात पाणीपुरवठा बंद राहिल. या काळात ठाणे महापालिका स्वताच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करणार आहे.