ठाणे : दुचाकी आणि रिक्षा चोरणाऱ्यांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2018 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई-ठाण्यातून दुचाकी आणि रिक्षांची चोरी करणाऱ्या दोन चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या 2 चोरांकडून 11 लाख 80 हजार रुपये किमतीच्या दुचाकी आणि रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. चोराकडून 3 दुचाकी आणि 8 रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या. दुचाकी चोरीप्रकणी ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.