नागपूर : राज्यातील तापमानाचा पारा वाढला, अचानक तापमान वाढल्याने नागरीक त्रस्त
Continues below advertisement
राज्यात उन्हाच्या झळांनी आत्तापासूनच अंगाची लाही लाही होते आहे. फेब्रुवारी महिन्यातच सरासरी तापमान 36 डिग्री सेल्सियस पर्यंत गेलं आहे. गारपिटीनंतर मध्य महाराष्ट्रात अँटी सायक्लॉन स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणातली आर्द्रता कमी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून अचानक राज्यातलं तापमान वाढलं आहे. त्यामुळे लोक होळीच्या आधीच उकाड्याने हैराण झालेयत. पुढचे तीन दिवस राज्यात ही तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच तेलंगणा, उत्तर कर्नाटक, मध्यप्रदेश अश्या आसपासच्या राज्यांमध्येही कमालीची तापमान वाढ झाली. फेब्रुवारीमध्येच ही स्थिती असेल तर एप्रिल-मे महिन्यात काय होईल ही चिंता लोकांना आत्तापासूनच सतावते आहे.
Continues below advertisement