नवी दिल्ली : नायब राज्यपालांविरोधातील लढाई केजरीवालांनी जिंकली
Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकारांची लढाई थेट सुप्रीम कोर्टात जिंकली. प्रत्येक निर्णयात उपराज्यपालांच्या परवानगीची गरज नाही. उपराज्यपाल दिल्लीचे प्रशासक आहेत. पण जनतेने निवडून दिलेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयात अडथळे आणू नये, प्रत्येक प्रकरणात एलजींची परवानगी आवश्यक नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासन प्रमुख आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्याविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Continues below advertisement