Pruthviraj Mohol wins 67th Maharashtra Kesari | पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपट

Maharashtra Kesari Result 2025 : अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला असून त्यामध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला. नंतर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी केली.  त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेतला. त्यानंतर मात्र काहीसा गोंधळ झाला आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. 

पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

Maharashtra Kesari Final Result 2025 : महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं

पृथ्वीराज मोहोळने दुसरा गुण मिळवल्यानंतर त्याबद्दल महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. पृथ्वीराजला दुसरा गुण हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचं त्याचं मत होतं. त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्याने मैदान सोडलं. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola