Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

Continues below advertisement

Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

India won T20 World Cup :   भारताने आयसीसी टी20 विश्वचषक 2026 जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने 255 धावांचा डोंगर उभा केला होता. संजू सॅमसन, इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी मोठी खेळी साकारली. या बदल्यात न्यझीलंडचा संघ 159 धावांवर बाद झाला. या विजयामुळे भारताला नेमके किती बक्षीस मिळाले? असा प्रश्न सर्वांच्याच मना असेल. तर भारतीय संघाला 3 दशलक्ष डॉलर्सचे म्हणजेच 27.48 कोटी रुपयांचे विक्रमी बक्षीस मिळाले. 

अभिषेकसह संजू सॅमसनचं तांडवं तर बुमराह आणि पटेलची जादू
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना  भारतानं जिकंला.  यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेक शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 89 धावांची वादळी खेळी केली. टी 20 विश्वचषकातील सलग तीन सामन्यात 50 च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. ईशान किशननेही जोरदार प्रदर्शन केलं. त्याने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 धावांची वादळी खेळी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह धमाका आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू चालली. बुमराहनं 4 षटकात फक्त 15 धावात 4 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलने 3 षटकात  27 धावा देत 3 विकेट घेतल्या

विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश
2026  च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली. सॅमसनने 89 धावा करत संघाचा सर्वाधिक धावा काढल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा दुसरा सर्वोच्च आणि टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.

जगात फक्त पाच वेळा एका संघाने एका डावात २५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या
जगात फक्त पाच वेळा एका संघाने एका डावात २५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या पाचपैकी तीन वेळा टीम इंडियाने हे साध्य केले आहे. टी-20 विश्वचषक सामन्यात तीन वेगवेगळ्या वेळी 250+ धावा करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. टीम इंडियाची ही कामगिरी देखील विशेष आहे कारण भारतीय संघाने एकाच विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola