स्पेशल रिपोर्ट : लोकसभेच्या जागावाटपावरुन भाजप-जेडीयूत तणाव, शाहांची डिनर डिप्लोमसी
Continues below advertisement
आता या निवडणुकीच्या राजकारणात महत्वाची राज्य कुठली तर यूपी बिहार. बिहारनं गेल्यावेळी 40 पैकी 22 जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. पण यावेळी नीतिशकुमार 17 ते 20 जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत. भाजप त्याला तयार नाहीए. मात्र सन्माननीय तोडगा निघाला नाही तर आपण पुन्हा लालूंसोबत जाऊ असे संकेत नीतिश यांनी दिल्यानं चक्क भाजप अध्यक्ष अमित शाह नीतिश यांची मनधरणी करण्यासाठी पोहोचलेत.
Continues below advertisement