सोलापूर : शिवजयंतीनिमित्त उपरी गावच्या महिला सरपंचांच्या हस्ते शिवध्वज फडकवला
Continues below advertisement
शिवजयंतीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच शिवध्वजाचं आज अनावरण करण्यात आलं. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे सरपंच सरस्वती मोहिते यांच्या हस्ते हा शिवध्वज फडवण्यात आला. उपरीतल्या ग्रामस्थांच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवण्यात आलेत.. याच निमित्ताने उपरी येथे 72 फूट उंचीचा लोखंडी खांबावर भव्य असा 30 फूट लांबीचा भगवा ध्वज लावण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ध्वज म्हणून त्याची नोंद झालीय. सध्या हा शिवध्वज परिसरातील अनेक गावांचं लक्ष वेधून घेतोय.
Continues below advertisement