बीड : पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना अडचणीत, अन्न आणि औषध प्रशासनाची नोटीस
Continues below advertisement
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात रसाच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर आता त्याची कारणं समोर आली आहेत. येत्या दहा दिवसात यात सुधारणा झाली नाही, तर कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.अन्न आणि औषध प्रशासनानं यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली आहे. खरं तर यापूर्वी कारखान्यानं त्रुटींची पूर्तात करणं आवश्यक होतं. मात्र 15 मार्चाला अन्न विभाग आणि राज्य गुप्तवार्ता विभागान काखान्याची पाहणी केली. तेव्हा अनेक त्रुटी आढलल्या. त्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आली. 8 डिसेंबरला वैद्यनाथ कारखान्यात स्फोट होऊन 7 जणांचा मृत्यू झाला होता.
Continues below advertisement