Rikshaw Strike | राज्यात ओला, उबरवर बंदीसह इतर मागण्यांसाठी 9 जुलैपासून रिक्षाचालकांचा संप | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2019 08:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या 9 जुलैपासून महाराष्ट्रातील रिक्षा चालक संपावर जाणार आहेत. ओला, उबेर आणि बेकायदा टॅक्सी सेवा तत्काळ बंद करण्यात यावी, हकीम समितीच्या शिफारसी तत्काळ सुरु करण्यात याव्यात आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. उद्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील 18 लाख तर मुंबई, नवी मुंबईतील 1 लाख 75 हजार रिक्षा चालक संपावर जाणार आहेत. त्यामुळे या संपाचा महाराष्ट्रभर प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.