राजस्थान : पँटमध्ये शौच केल्याच्या कारणावरुन दोन चिमुकल्यांना पित्याची अमानुष मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2018 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजस्थानच्या राजसमन्दमध्ये एका पित्याचा क्रुर चेहरा जगासमोर आलाय. एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांना चक्क दोरीने बांधून मारहाण केलीये. पँटमध्ये शौच केल्याच्या क्षुल्लक कारणावरुन ही अमानुष मारहाण करण्यात आलीये. ही घटना घडली तेव्हा मुलांची आई घरात नव्हती त्यामुळे या क्रुर पित्याने मुलांना नग्न करुन मारलंय. पण आणखी दुर्देवाची गोष्ट म्हणजे मुलाच्या आईला जेव्हा या सगळ्या प्रकाराबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने चक्क आपल्या नवऱ्याची बाजू घेत मारहाणीचं समर्थन केलं. हा व्हिडीओ पोलिसांना दाखवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत मुलांना मारहाण करणारा वडिल मात्र पसार झाला होता. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं बोललं जातंय.