Rahul in Mumbai Court | गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपांच्या वादाच्या सुनावणीसाठी राहुल गांधींची आज शिवडी कोर्टात हजेरी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2019 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौरी लंकेश प्रकरणात संघविरोधात ट्विट केल्याप्रकरणी शिवडी कोर्टाक़डून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर झाला. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. यापुढील लढाई आणखी जोमानं लढणार असल्याचं यावेळी राहुल गांधींनी स्पष्ट केलं. यावेळी शिवडी न्यायालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.