पुणे : स्थायी समितीत पे अँड पार्क योजनेला संमती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2018 12:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यात यापुढे पार्किंगसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत पे अँड पार्क या योजनेला विरोधी पक्षांचा विरोध डावलून भाजपनं मंजुरी दिली. त्यामुळे आता पुणे शहारामध्ये दिवसा आणि रात्री पार्किंगसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. तीन प्रकारांमध्ये शहरातील रस्त्यांच वर्गीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील वर्दळीनुसार दर ठरवले जाणार आहेत. गाडी पार्क करण्यासाठी आगाऊ रक्कम देऊन परवाना घेता येणार आहे.