पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीनावर आज सुनावणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2018 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांच्या जामिनावरील सुनावणी आज होणार आहे. काल न्यायमूर्ती आर एन सरदेसाई न्यायालयात गैरहजर राहिल्याने जामिनावरील सुनावणी ढकलली गेली होती. त्यामुळे त्यांना जामीन मिळतो की त्यांचा तुरुंगातला मुक्काम वाढतो, हे पाहणं महत्वाचं आहे. नियम डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका या बँक अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. यात रवींद्र मराठे यांच्यासह एकूण सहा जण अटकेत आहेत.