पुणे : एम्प्रेस गार्डनमध्ये शासकीय निवासस्थानांचा प्रस्ताव, काँग्रेसचं आंदोलन
Continues below advertisement
पुण्याचं वैभव समजलं जाणारं एम्प्रेस गार्डनच्या 10 एकर जागेवर शासकीय निवासस्थानं बांधण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. इम्प्रेस गार्डन हे पुण्याचं फुप्फुस असून, भाजप सरकारचा हा निर्णय पर्यावरणविरोधी असल्याचा आरोप काँग्रेस शहाराध्यक्ष रमेश बागवे यांनी केलाय. तसंच सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं गार्डनचे सचिव सुरेश पिंगळे म्हणालेयत. एम्प्रेस गार्डन हे ब्रिटीशकालिन काळापासून आहे. इथं रोज शेकडो पर्यटक आपल्या मुलाबाळांसह येत असतात. अनेकदा इथं फुलांचं प्रदर्शनही भरवण्यात येतं.
Continues below advertisement