पुणे विमानतळावर शिलाई मशिन, इस्त्रीतून सोन्याची तस्करी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2017 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे विमानतळावर शिलाई मशिन आणि इस्त्रीमध्ये सोनं घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करण्यात आलीए... कारवाईत 97 लाख रुपये किमतीचे 4 किलोपेक्षा अधिक वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. सैफुला नासर दुडगावे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जेट एअरवेजच्या अबु धाबी विमानातून पुणे विमानतळावर उतरलेल्या इसमाचा संशय आल्याने त्याची झडती घेण्यात आली... त्याच्या बॅगेतील इस्त्री आणि शिलाईमशिनमध्ये सोनं लपवून ठेवलेलं आढळलं..