पंढरपूर : 111 वर्षांच्या आजीबाईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 6 पिढ्या एकत्र

Continues below advertisement

सांगोला तालुक्यातील शिरभावी गावात एकशे अकरा वर्षांच्या आजीबाईंचा वाढदिवस गावातल्या वृद्धांसाठी चांगलाच आरोग्यदायी ठरलाय. सरुबाई खेंडकर असं या आजीबाईंचं नाव आहे. शिरभावी गावात सरुबाईंचे सहा मुलं एकत्र राहतात. विशेष म्हणजे त्यांचा मोठा मुलगा सहदेव यांचं वय ९१ वर्ष आहे. आज खेंडकरांची सहावी पिढी सुद्धा आजीबाईंच्या अंगाखांद्यावर खेळु लागलीये. आपल्या पणजीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी सरुबाईंचा पणतू पितांबर याने पुढाकार घेतला आणि गावातील सर्व वृद्धांची मोफत आरोग्यतपासणी करण्याचा उपक्रम घेतला. या उपक्रमामुळे एकशे अकरा वर्षांच्या आजीही खुष झाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram