शिलाँग : एनपीपीचे कॉनराड संगमा आज मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे माजी नेते पी.ए.संगमा यांचे पुत्र आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कॉनराड संगमा आज मेघालयाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत 11 इतर मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. आजच्या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहणार आहेत. गेली 10 वर्ष मेघालयात काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी काँग्रेसला 60 पैकी फक्त 21 जागा जिंकत्या आल्या. तर कॉनराड यांच्या एनपीपीला 19, भाजपला 2 जागा मिळाल्या. त्यानंतर यूडीपी, एचएसपीडीपी आणि अपक्षांच्या जोरावर 32 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र कोनराड यांनी राज्यपालांना दिलंय.
विशेष म्हणजे मेघालयाच्या कोनराड त्यांचे भाऊ जेम्स आणि बहीण अगाथा संगमाही मेघालय विधानसभेवर निवडून गेलेत.
विशेष म्हणजे मेघालयाच्या कोनराड त्यांचे भाऊ जेम्स आणि बहीण अगाथा संगमाही मेघालय विधानसभेवर निवडून गेलेत.
Continues below advertisement