Suryakant Chafekar On Operation Sindoor : दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त, एअर स्ट्राईकची A to Z स्टोरी

Suryakant Chafekar On Operation Sindoor : दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त, एअर स्ट्राईकची A to Z स्टोरी 
Operation Sindoor: भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं. 

ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं?

संरक्षण मंत्रालयानं  म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25  आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईळ. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola