Indian economy Special Report | भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले
Indian economy Special Report | भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले
५ ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष्य ठेवलेल्या भारताची त्या दिशेनं आगेकूच सुरु आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे. बलाढ्य जपानला भारताने मागे टाकत, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता भारतापुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत.
येत्या अडीच-तीन वर्षात भारत तिसऱ्या स्थानी पोहचेल असं सांगितलं जातंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
तमाम भारतीयांसाठी अभिमानाची आणखी एक गोष्ट घडली.
पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या टारगेटच्या दिशेनं भारतानं आणखी एक पाऊल टाकलं
बलाढ्य जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम गवर्निंग काऊंसिलिगच्या दहाव्या बैठकीनंतर ही माहिती देत आहेत
भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सची झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफच्या हवाल्याने सुब्रमण्यम यांनी म्हंटलं आहेे
भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत.























