तालिबान्यांपासून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न, Afghanistan मधील काळीज चिरणारा व्हिडीओ : ABP Majha
Continues below advertisement
काबूल विमानतळाबाहेरचा एक व्हिडीओ कोणाच्याही डोळ्याच्या कडा ओलावणारा आहे. तालिबान राजवटीत आपलं काय होईल ते होईल, पण आपल्या तान्ह्या मुलाला सुरक्षित भविष्य दिसावं, यासाठी एका मातेनं हृयावर दगड ठेऊन तान्हुल्याला कुशीतून दूर केलंय.
तालिबाननं काबूलचा ताबा घेतल्यानंतर काबूल विमानतळाच्या भिंतीबाहेर अनेक अफगाण नागरिकांनी गर्दी केली होती. अमेरिकेच्या सैनिकांना त्यांच्या मदतीसाठी विनवण्या सुरू होत्या. अशात एका मातेनं आपल्या तान्हुल्याला घेण्याची विनवणी सैनिकांना केली आणि जवानांनीही या बाळाला ताब्यात घेतलं. बाळ दूर होण्याचं दुःख या मातेला नक्की असेल, पण ते बाळ सुरक्षित असेल या कल्पनेत तिनं आनंद पाहिला असावा.
Continues below advertisement