Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?

Continues below advertisement

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे..या अपघातात भरधाव कार विहिरीत कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं पाहूयात...३ एप्रिलच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास...नाशिकच्या दिंडोरीमध्ये घडला हा भीषण अपघात...याच विहिरीत एक कार कोसळली आणि त्यात बसलेल्या नऊही जणांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला..दिंडोरीच्या इंदोरे गावचं रहिवासी असलेलं दरगोडे कुटुंब आणि त्यांचे चार नातेवाईक एका स्नेहसंमेलनावरून घरी परतत होते...मात्र शिवाजीनगर इथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत ही कार कोसळली आणि या अपघातातकारमधील सर्वांनी आपला जीव गमावला....विहीरमालक राजेंद्र राजेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय....अपघाताची माहिती कळताच मंत्री आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली तसंच मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली...मात्र यावेळी आक्रमक पवित्रा घेत दोषींवर कारवाईची मागणी केली...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola