Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

Continues below advertisement

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यामागून यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे ठाकरे गटाच्या खासदारांशी गुप्तपणे सातत्याने संपर्कात आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीला ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी आठ खासदार उपस्थित होते. बुधवारी रात्री शिंदे यांचा ताफा अचानक वेगळ्या मार्गाने वळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात ही बैठक पार पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन जे असतं ते एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचे ऑपरेशन होते तेव्हा ते डेडबॉडीचं ऑपरेशन असतं. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांच्या पक्षाची डेडबॉडी केलेली आहे. सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे करत आहेत. शिवसेनेचे नऊ खासदार हे एकजुटीने एकत्र आहेत. मी काही नावं वाचली तर मला हसायला आले. हे अत्यंत हास्यास्पद आहे. उद्या माझे नाव टाकतील. आदित्य साहेबांचे देखील नाव टाकतील. या प्रकारच्या बातम्या वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जात आहेत किंवा आम्ही काहीतरी घडामोडी करत आहोत हे दाखवण्यासाठी केले जात आहे. हे चुकीचे असल्याचा पलटवार त्यांनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola